Mutual Funds SIP Returns: गेल्या काही वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांचा कल सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनकडे झपाट्याने वाढला आहे. कारण, मासिक एसआयपी खरोखरच 'रिटर्नचा राजा' सिद्ध होत आहे! एका अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत सुमारे २९ इक्विटी म्युच्युअल फंड्सनी २० टक्क्यांहून अधिक XIRR (Extended Internal Rate of Return) परतावा दिला आहे. बाजारात पाच वर्षे पूर्ण केलेल्या २०८ फंड्सपैकी हे टॉप परफॉर्मर्स ठरले आहेत, ज्यांनी लहान-मोठ्या चढ-उतारांना तोंड देत सातत्याने मजबूत परतावा दिला आहे. हे आकडे दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद स्पष्टपणे दाखवतात.
मिड कॅप फंड्सची 'बाजी'
सर्वाधिक XIRR देण्याच्या बाबतीत मिड कॅप फंड्स सर्वात पुढे राहिले.
| क्रमांक | म्युच्युअल फंड | XIRR (%) (५ वर्षांत) |
| १ | मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड | २५.६७ |
| २ | बंधन स्मॉल कॅप फंड | २५.५२ |
| ३ | इन्व्हेस्को इंडिया मिड कॅप फंड | २४.६१ |
| ४ | एचडीएफसी मिड कॅप फंड | २३.५८ |
| ५ | मोतीलाल ओसवाल लार्ज अँड मिड कॅप फंड | २३.२५ |
मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंडाने सर्वाधिक २५.६७% XIRR दिला. याचा अर्थ असा की, जर तुम्ही दरमहा १०,००० रुपयांची एसआयपी केली असती, तर तुमची एकूण ६ लाख रुपयांची गुंतवणूक आज ११.१६ लाख रुपयांपर्यंत पोहोचली असती.
स्मॉल आणि फ्लेक्सी कॅपचीही चमक
| फंड सेगमेंट | टॉप परफॉर्मर (XIRR %) |
| स्मॉल कॅप | बंधन स्मॉल कॅप फंड (२५.५२%) आणि क्वांट स्मॉल कॅप फंड (२१.६४%), निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड (२१.२३%) |
| मिड कॅप ग्रोथ | निप्पॉन इंडिया ग्रोथ मिड कॅप फंड (२२.७२%) आणि एडलवाइस मिड कॅप फंड (२२.६९%) |
| फ्लेक्सी कॅप | एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड (२१.५२%) |
| फोकस्ड | आयसीआयसीआय प्रू फोकस्ड इक्विटी फंड (२०.७६%) |
टॅक्स सेव्हर (ELSS) फंड्सही पुढे
गुंतवणुकीसोबत कर सवलत मिळवू इच्छिणाऱ्या ELSS फंड्सनी देखील २०% पेक्षा जास्त XIRR नोंदवला आहे.
एसबीआय ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड: २०.४३% XIRR
एचडीएफसी ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड: २०.१९% XIRR
या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, बाजारातील चढ-उतारांना घाबरून न जाता, शिस्तबद्ध पद्धतीने आणि दीर्घकाळासाठी एसआयपी सुरू ठेवल्यास चांगला परतावा मिळण्याची क्षमता आहे.
वाचा - आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
